ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी 18 सुदानी महिलांसह एका भारतीयाला महसूल गुप्तचर संचालनालयाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 16.36 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची बाजारातील किंमत 10.16 कोटी रुपये आहे.
यूएईहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सिंडिकेटद्वारे पेस्ट स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने विमानतळावर पाळत ठेवली होती. तीन फ्लाइट्समधील सिंडिकेटचा भाग असल्याचा संशय असलेल्या प्रवाशांना विमानतळावर डीआरआयच्या पथकाने ओळखले आणि त्यांना रोखले. त्यांची झडती घेतल्यानंतर डीआरआयने पेस्ट स्वरूपात, सोन्याचे तुकडे आणि दागिने असे एकूण 16.36 किलो सोने जप्त केले. जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने संशयित प्रवाशांच्या अंगावर लपवून ठेवलेले आढळले.
दरम्यान, 22 एप्रिल रोजी मुंबई कस्मट विभागाने या विमानतळावर 1.60 कोटी रुपयांचे सोने जप्त केले होते. या प्रकरणी तीन भारतीय प्रवाशांना अटक करण्यात आली होती. विमानतळावरील बॅगेज ट्रॉलीखाली सोन्याचे बार चिकटवून हे चोरटे तस्करीचा प्रयत्न करत होते.