प्रतिनिधी,कोल्हापूर
Rajaram Factory Election : राजाराम कारखाना निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्ताखालील राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीचे सर्व 21 उमेदवार विजयी झाले. गत निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांना पाठबळ दिलेल्या करवीर, राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातून यंदाच्या निवडणुकीत विरोधकांना गतनिवडणुकीच्या तुलनेत कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे या तालुक्यात सत्ताधाऱ्यांचे मतदान वाढल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील 122 गावांपैकी केवळ 11 गावांमध्येच विरोधकांना मताधिक्य मिळाले असल्याचे चित्र आहे.
राजाराम कारखाना निवडणुकीसाठी मंगळवारी मतमोजणी झाली. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीची प्रक्रीया पार पडली. सकाळी पाऊणे दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पहिल्या फेरीतील निकाल स्पष्ट झाला. यामध्ये महाडिक आघाडीने सुमारे आठशे मतांचे मताधिक्य मिळाले. तर दुपारी दोन नंतर दूसऱ्या फेरीतील मतमोजणीला प्रारंभ झाला. यामध्येही महाडिक गटाने आघाडी राखत सर्व जागांवर विजय मिळविला.
संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी
संस्था गटातील मतमोजणीस दुपारी दोन वाजता सुरवात झाली. या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असल्याने मतमोजणी सुरु असलेल्या टेबलवर दोन्ही बाजूच्या समर्थकांनी गर्दी केली. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी 128 पैकी 83 तर विरोधी आघाडीचे उमेदवार सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. तर एक मत बाद ठरले. माजी आमदार महाडिक यांनी 39 मतांनी विजयी मिळविला.
कसबा बावड्यातून महाडिकांना दिलासा
कसबा बावडा, पुलाची शिरोली येथे सर्वाधिक मतदान होते. बावड्यातून सतेज पाटील गटाला मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण कसबा बावड्यात सतेज पाटील गटाला सरासरी 605 तर महाडिक गटाला 310 इतके मतदान मिळाले. हे मतदान महाडिक गटाला दिलासा देणारे होते. तर पुलाची शिरोली येथे महाडिक गटाला सरासरी 714 तर पाटील गटाला 127 मते मिळाली. त्यामुळे महाडिक गटाला पुलाची शिरोलीसह कसबा बावड्याचीही साथ मिळाली.
कुंभीचा फटका, 21 चा झटका
करवीर तालुक्यातील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पॅनेलला पाठींब दिला होता. याचा फटका आमदार पाटील यांनी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत बसला. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील यांचा प्रभाव असणाऱ्या गावांचा समावेश होता. या गावांमधून आमदार पाटील गटाला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. करवीरमधूनही आमदार पाटील यांचे पॅनेल मागे पडल्यानंतर आमदार पी. एन. पाटील यांनी कुंभीचा फटाका, 21 झटका असे स्टेटस सोशल मीडियावर लावत अप्रत्यक्षरित्या कुंभीच्या निवडणुकीतील वचपा काढल्याचे पी. एन. यांच्या समर्थकांनी जाणवून दिले.
सतेज पाटील गटाला 11 गावांमध्ये
राजाराम कारखान्याचे 122 गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे. यामध्ये विरोधी सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील परिवर्तन आघाडीला केवळ 11 गावांमध्येच मताधिक्य मिळाले. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, पट्टणकोडोली, रुई, भेंडवडे कागल तालुक्यातील वंदूर, पन्हाळा तालुक्यातील आळवे, करवीरमधील कसबा बावडा, राधानगरी तालुक्यातील धामोड, कसबा तारळे, गगनबावडा येथील साळवण, शाहूवाडी येथील कडवे आदी गावांचा समावेश आहे.
करवीर, गगनबावडा, राधानगरीत निराशा
विरोधी सतेज पाटील गटाला करवीर, गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यातील गावांमधून मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. या तालुक्यातील मिळणारे मताधिक्य महाडिक गटाचे हातकणंगले तालुक्यातील मताधिक्य मोडीत काढेल अशी अपेक्षा पाटील गटाला होती. मात्र या तिनही तालुक्यातून पाटील गटाला अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने करवीर, गगनबावडा, राधानगरीमधून विरोध गटाच्या पदरी निराशा पडली.
सत्ताधारी राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडी आणि विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी :
उत्पादक गट क्रमांक 1
विजय वसंत भोसले 6803
संजय बाळगोंडा मगदुम 6651
किरण बाबासो भोसले 5236
शालन बाबुराव बेनाडे 5294
उत्पादक गट क्रमांक 2
अमल महादेवराव महाडिक 6936
शिवाजी रामा पाटील 6692
सर्जेराव बाबुराव भंडारे 6598
दिलीप गणपतराव पाटील 5111
शिवाजी ज्ञानू किबीले 5023
अभिजीत सर्जेराव माने 4775
उत्पादक गट क्रमांक 3
डॉ. मारुती भाउसो किडगांवकर 6760
विलास यशवंत जाधव 6548
सर्जेराव कृष्णा पाटील 6446
विठ्ठल हिंदुराव माने 5085
विलास शंकर पाटील 4875
बळवंत रामचंद्र गायकवाड 4860
उत्पादक गट क्रमांक 4
दिलीपराव भगवान पाटील 6665
तानाजी कृष्णात पाटील 6636
मिनाक्षी भास्कर पाटील 6593
सुरेश भिवा पाटील 5218
संभाजी शंकरराव पाटील 5060
दिनकर भिवा पाटील 4731
उत्पादक गट क्रमांक 5
दिलीप यशवंत उलपे 6742
नारायण बाळकृष्ण चव्हाण 6545
विजयमाला विश्वास नेजदार 5355
मोहन रामचंद्र सालपे 5085
विजय रामकृष्ण चव्हाण 66
उत्पादक गट क्रमांक 6
गोविंदा दादू चौगले 6755
डॉ. विश्वास सदाशिव बिडकर 6610
दगडू मारुती चौगले 5277
शांताराम पांडुरंग पाटील 5206
महिला राखीव प्रतिनिधी
वैष्णवी राजेश नाईक 6837
कल्पना भगवानराव पाटील 6811
निर्मला जयवंत पाटील 5327
पुतळाबाई मारुती मगदूम 5226
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
संतोष बाबुराव पाटील 6870
डॉ. मानसिंगराव दत्तु खोत 5342
विमुक्त जाती/ भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग
सुरेश देवाप्पा तानगे 6884
आण्णा विठु रामाण्णा 5340
अनुसुचित जाती/ जमाती प्रतिनिधी
नंदकुमार बाबुराव भोपळे 6599
बाबासो थळोजी देशमुख 5372
दिगंबर लिंगाप्पा पोळ 43
संस्था गट प्रतिनिधी
महादेवराव रामचंद्र महाडिक 83
सचिन नरसगोंडा पाटील 44
Previous Articleमुंबई विमानतळावर 10 कोटींचे सोने जप्त; 18 सुदानी महिलांना अटक
Next Article प्रवेशपत्रे लीक होणे, हे लोकसेवा आयोगाचे अपयश
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.