स्कॉटलंडमध्ये झाली होती निर्मिती
स्कॉटलंडमध्ये तयार करण्यात आलेल्या व्हिस्कीच्या एका अनोख्या बाटलीची सुमारे 10 कोटी 26 लाख रुपयांमध्ये विक्री झाली आहे. याला सिंगल माल्ट ‘पवित्र व्हिस्की’ देखील म्हटले जात आहे. स्कॉटलंच्या एका ऑनलाईन सेलमध्ये मॅकॉलन 1926 च्या 60 वर्षे जुन्या या बाटलीची विक्री झाली आहे.
मोरये डिस्टीलरीच्या विशेष कास्क क्रमांक 263 द्वारे व्हिस्कीच्या अशा 14 विशेष बॉटल्स तयार करण्यात आल्या होत्या. 10 कोटी 26 लाख रुपयांमध्ये विकली गेलेली बॉटल्स याच 14 पैकी एक होती.
मोरये डिस्टीलरीच्या कास्क क्रमांक 263 ला जगातील सर्वात प्रसिद्ध व्हिस्की कास्कही म्हटले जाते. व्हिस्की तयार करण्यासाठी या कास्कमध्ये समाग्री 1926 मध्येच टाकण्यात आली होती आणि 60 वर्षांनी 1986 मध्ये त्याला बॉटलीत पॅक करण्यात आले होते. कास्क क्रमांक 263 द्वारे एकूण 40 बॉटल्स व्हिस्की तयार करण्यात आली होती, पण, 40 पैकी केवळ 14 बाटल्यांवर फाइन अँड रेयर कलेक्शनचे मार्किंग करण्यात आले होते. तर जगात एका व्हिस्की बाटलीला यापूर्वी विक्रमी 15 कोटी 39 लाख रुपयांचे मूल्य प्राप्त झाले आहे. 2019 मध्ये लंडनमध्ये व्हिस्कीच्या या बाटलीचा लिलाव झाला होता. ही बाटली देखील कास्क क्रमांक 263 मधूनच पॅक करण्यात आली होती