83 कैदी, 22 कर्मचाऱयांची झाली होती स्वॅब तपासणी, बाधितांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील 11 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी आलेल्या स्वॅब तपासणी अहवालामुळे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. कारागृहात खबरदारी घेण्यात आली असून नव्या प्रकरणात येणाऱया कैद्यांना स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात येत आहे. कारागृहातील एकूण बाधितांची संख्या 15 वर पोहोचली आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी तीन कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. लुटमार प्रकरणी कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या 29 वषीय तरुणाचा अहवाल दि. 3 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन काकती पोलिसांनी अटक केलेल्या 29 वषीय तरुणाला 8 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. खडेबाजार पोलिसांनी अटक केलेल्या व नंतर पुणे पोलिसांनी पोलीस कोठडीत घेतलेल्या 21 वषीय तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे दुसऱयाच दिवशी 9 जुलै रोजी स्पष्ट झाले होते.