अमेरिकेतून येत शेंगदाणे विकणाऱयाचा घेतला शोध
2010 साली नेमानी प्रणव आणि त्याची बहिण सुचिता स्वतःचे वडिल मोहन यांच्यासोबत आंध्रप्रदेशच्या यू कोथापल्ली समुद्रकिनाऱयावर फिरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी सत्तैया नावाच्या शेंगदाणे विकणाऱयाकडून शेंगदाणे घेतले. परंतु मोहन यांना पाकीट विसरल्याचे लक्षात येत शेंगदाणे विकणाऱयाला देण्यासाठी पैसे नसल्याची जाणीव झाली.
स्थिती ओळखून सत्तैया यांनी पैशांसाठी तगादा न लावता शेंगदाणे मोफत दिले. परंतु लवकरच त्यांचे पैसे परत करू असे आश्वासन देत मोहन यांनी त्यांच्यासोबत एक छायाचित्र काढून घेतले. परंतु उधारीची परतफेड करण्याचे आश्वासन त्यांना लवकर पूर्ण करता आले नाही. कारण ते अनिवासीय भारतीय होते आणि काही दिवसांनी त्यांना अमेरिकेत परतावे लागले.
11 वर्षांनी भारतात परतले
सुमारे 11 वर्षांनी नेमानी बहिण सुचितासोबत भारतात परतले असता त्यांनी शेंगदाणे विकणाऱयाचा शोध घेत उधारी परत करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडिल मोहन देखील पैसे परत करण्यास अत्यंत उत्सुक होते. याचमुळे त्यांनी सत्तैयांचा शोध घेण्यासाठी काकीनाडाचे आमदार चंद्रशेखर रेड्डी यांची मदत घेतली.
25 हजार रुपये दिले
मोहन यांच्या विनंतीनंतर आमदाराने त्वरित फेसबुकवर सत्तैयांच्या शोधाकरता एक पोस्ट केली, ज्यावर नगुलापल्ली गावातील काही लोक आमदाराच्या सचिवांकडे पोहोचले आणि सत्तैयांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत नेमानी अणि सुचिता यांनी त्यांच्या कुटुंबाला 25 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.