इराणमधील थरारक घटना : कौटुंबिक वादातून कृत्य
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणमध्ये एका 30 वषीय व्यक्तीने सामूहिक गोळीबारात आपल्या वडिलांसह एकूण 12 नातेवाईकांची हत्या केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गोळीबारासाठी आरोपीने असॉल्ट रायफलचा वापर केल्याचे सांगण्यात आले. इराणमधील दुर्गम ग्रामीण भागात घडलेली गोळीबाराची ही घटना काही दशकांतील सर्वात प्राणघातक असल्याचेही सांगण्यात आले. कौटुंबिक वादातून एका गावात पहाटेच्या सुमारास बंदुकधारी व्यक्तीने आपले वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांवर गोळीबार केल्याचे केरमन प्रांताच्या न्याय विभागाचे प्रमुख इब्राहिम हमीदी यांनी सांगितले. यात एकूण 12 जणांना जीव गमवावा लागला असून इराणमधील कोणत्याही कौटुंबिक हिंसक घटनेतील मृत्यूची ही सर्वाधिक संख्या असल्याचेही ते पुढे म्हणाले.