वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची अनमोल खराब हिची कामगिरी दर्जेदार झाल्याने राष्ट्रीय प्रमुख बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी तिचे खास कौतुक केले आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील 17 वर्षीय अनमोल खराबने जपानच्या 29 व्या मानांकीत नासुकी निडेराचा निर्णायक एकेरीच्या सामन्यात पराभव केल्याने भारताला या स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली.
फरिदाबादची अनमोल खराब ही आव्र्रमक आणि सभ्य बॅडमिंटनपटू असल्याचे गोपीचंद यांनी म्हटले आहे. आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. 2023 च्या डिसेंबरमध्ये अनमोल खराबने वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. अनमोलने बुधवारी या स्पर्धेत चीनच्या यू चा तीन गेम्समध्ये पराभव केला होता.