शेरी गल्लीतील घटना : 22 तोळे सोने, 2 किलो चांदी लांबविली
प्रतिनिधी /बेळगाव
नातेवाईकांच्या समारंभाला संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून गेले असता चोरटय़ांनी केवळ सव्वातासात घर फोडून 14 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सतत गजबजलेल्या शेरी गल्ली येथे दिवसाढवळय़ा घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
शेरी गल्ली येथील अभिजित आप्पासाहेब बोगार हे कुटुंबासह मठ गल्ली येथे त्यांच्या नातेवाईकांच्या समारंभाला गेले होते. जाताना घराला कुलूप लावण्यात आला होता. मात्र चोरटय़ांनी तो कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाट फोडून चोरटय़ांनी 22 तोळय़ाचे सोन्याचे दागिने, 2 किलो चांदीच्या वस्तू व रोख 70 हजार रुपये चोरुन नेले. समारंभ आटोपून घरी आले असता त्यांना घराचा कुलूप फोडल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी या घटनेची तातडीने माहिती खडेबाजार पोलीसांना दिली. खडेबाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले. श्वानपथक काही अंतरावर जाऊन घुटमळले. तर ठसेतज्ञांनी ठसे घेतले आहेत. या घटनेमुळे बोगार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दुपारी 1.30 ते 2.40 यावेळेत चोरटय़ांनी चोरी केली आहे. दिवसाढवळय़ा चोरी झाल्याने चोरटे माहितीगारच असणार आहेत. याचबरोबर समारंभाला जाणार आहेत, याची सर्व माहिती चोरटय़ांना असण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
रात्री उशीराने खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये अभिजित यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शहरामध्ये सतत रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.