प्रतिनिधी / बेळगाव
कुदेमनी येथील श्री बलभीम साहित्य संघातर्फे 15 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 31 रोजी होणार आहे. कै. परशराम मिनाजी गुरव साहित्यनगरीत हे संमेलन होणार असून कुदेमनी हायस्कूलच्या कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. दोन सत्रात हे संमेलन भरविण्यात येत आहे.
सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून श्री विठ्ठल-रखुमाई मूर्ती पूजन सौ. व श्री. गावडू आपुणी गुरव यांच्या हस्ते तर पालखी पूजन सौ. व श्री. मल्लाप्पा निंगाप्पा पाटील, ग्रंथपूजन सौ. व श्री. लक्ष्मण पाटील, ग्रंथदिंडी उद्घाटन सौ. व श्री. जोतिबा मारुती बडसकर, अश्वारुढ शिवपुतळा पूजन हरे कृष्णा मार्केटिंगचे व्यवस्थापक यल्लाप्पा गणपती गुरव, परशराम मि. गुरव साहित्यनगरीचे उद्घाटन वैभव इंडस्ट्रीज-बेळगावचे सदानंद वैजू धामणेकर, ग्रंथदालन उद्घाटन निवृत्त बीएसएनएल कर्मचारी गावडू नेमाणी पाटील, परशराम गुरव स्मारक पूजन निवृत्त बीएसएनएल कर्मचारी विष्णू कृष्णा जांबोटकर, सैनिक सूरज सूर्यकांत शिंदे, पॉलिहैड्रॉन व्यासपीठ उद्घाटन वैजनाथ नर्सिंग होम, शिनोळीच्या वंदना गुरव, संत ज्ञानेश्वरी प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्य शांताराम पाटील, संत तुकाराम प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्य शिवाजी रामू मुरकुटे, शिवप्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्या रेणुका नाईक, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन हायस्कूल कमिटीचे अध्यक्ष ईश्वर कल्लाप्पा गुरव, राजर्षि शाहू महाराज प्रतिमा पूजन माजी ग्रा. पं. अध्यक्ष सुरेश विठ्ठल पाटील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन पीकेपीएस उपाध्यक्ष मल्लाप्पा गुंडू कदम यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. टी. पाटील असणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता प्रास्ताविक पी. एल. गुरव करणार असून स्वागताध्यक्ष भाषण राजाराम गुंडू राजगोळकर यांचे होणार आहे. दुसऱया सत्रात दुपारी 12 वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, सुनील पाटील, प्रा. अशोक अलगोंडी, सुधाकर ना. गावडे हे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. सूत्रसंचालन माणिक गोवेकर व राम गुरव करणार आहेत.
या संमेलनासाठी पॉलिहैड्रॉन बेळगाव, मराठा बँक, सहय़ाद्री सोसायटी, भाग्यलक्ष्मी सोसायटी, पीकेपीएस सोसायटी, रवळनाथ दूध संघ, कलमेश्वर सोसायटी-कंग्राळी, व्यापारी बंधू मार्केट यार्ड, साई ग्लास शिनोळी, समस्त युवक संघटना, प्राथमिक व माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, भजनी मंडळे, स्व-साहाय्य संघ, पतसंस्था, दूध संस्था, ग्राम पंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.