आफ्रिकेतील देश असलेल्या झिम्बाम्बेमध्ये एका व्यक्तीचे लोकसंख्या नियंत्रण किंवा कुटुंब नियोजन यासारख्या गोष्टींचे दूर-दूरपर्यंत काहीच संबंध नाही. कारण या व्यक्तीने आतापर्यंत 151 मुलांना जन्माला घातले आहे. या व्यक्तीच्या 16 पत्नी असून लवकरच तो 17 वा विवाह करणार आहे. 66 वर्षीय या व्यक्तीचे 100 विवाह करण्याचे स्वप्न आहे.
मी कुठलेच काम करत नाही. माझे पूर्णवेळ काम कुटुंबाला समाधानी ठेवणे असल्याचे मिशेक न्यानदोरो यांनी म्हटले आहे. झिम्बाम्बेच्या मशोनालँड सेंट्रल प्रांतातील बायर जिल्हय़ात राहणारा मिशेकला 150 मुलांमुळे कुठल्याही प्रकारचा दबाव झेलावा लागत नाही. उलटपक्षी लाभच होतो, कारण मुलांकडून त्याला आर्थिक मदत मिळत राहते.
हे विशाल कुटुंब शेतीद्वारेच स्वतःची गुजराण करते. या व्यक्तीची 6 मुले झिम्बाम्बेच्या सैन्यात कार्यरत आहेत. 2 मुले पोलीस विभागात आहेत. तर 11 मुले विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या व्यक्तीच्या 13 मुलींचा विवाह झाला आहे.
या व्यक्तीने 2015 मध्ये अखेरचा विवाह केला होता. मिशेक पुन्हा एकदा चालू वर्षात 17 व्या विवाहाचे प्लॅनिंग करत आहे. मिशेकने झिम्बाम्बेच्या स्वातंत्र्यासाठी 1964 ते 1979 पर्यंत चाललेल्या रोडेशियन बुश वॉरमध्ये भाग घेतला होता.