कोलंबियाच्या किनाऱयानजीक लागला शोध
समुद्रात बुडालेल्या एका जहाजात मोठा खजिना मिळाला आहे. हा जगातील सर्वात मूल्यवान खजिन्यांपैकी एक आहे. हे जहाज कोलंबियाच्या किनाऱयापासून काही अंतरावर समुद्राच्या तळाशी सापडले आहे. या जहाजाला सॅन जोस गॅलियन या नावाने ओळखले जाते. या जहाजातील खजिन्याचा शोध कोलंबियाच्या नौदलाने लावला आहे. एका अनुमानानुसार या जहाजात सुमारे 17 अब्ज डॉलर्सच्या किमतीचे सोने, चांदी आणि दागिने आहेत. हे जहाज 1708 साली बुडाले होते आणि सुमारे 300 वर्षांनी याच्या अवशेषांचा शोध लावता आला आहे. एका रोबोटद्वारे या बुडालेल्या जहाजाचा शोध लावणे शक्य झाले आहे. परंतु याचा अचूक ठावठिकाणा अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे.
या जहाजाला कधीकाळी स्पेनच्या नौदलाचे मुकुट म्हटले जायचे. 1708 मध्ये ब्रिटिश नौदलाने या जहाजाला बुडविले होते. या जहाजावर 64 तोफा होता त्यांच्यासाठीचा दारूगोळा देखील होता. लढाईदरम्यान या दारूगोळय़ाने पेट घेतल्याने जहाजात आग लागली होती. स्फोटानंतर हे जहाज बुडाले होते. या जहाजावर चालक दलाचे 600 सदस्य होते, ते देखील बुडाले होते. परंतु जहाजासोबत समुद्रात सोने, चांदी आणि अन्य दागिनेही गमवावे लागले होते. या खजिन्याचे आताचे मूल्य 17 अब्ज डॉलर्स इतके असल्याचे मानले जाते. याचमुळे या खजिन्याचा शोध घेतला जात होता.
2015 मध्ये वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टीटय़ूशनने याचा शोध लावला होता. या जहाजावरील कलाकृती पाहून याची ओळख पटविण्यात आली होती. कोलंबिया सरकारने दोन वर्षांनी हा खजिना पुन्हा मिळविण्यासाठी शोधमोहिमेची घोषणा केली आहे. यानंतर रोबोटच्या मदतीने जगाला पहिल्यांदाच पाण्यातील मौल्यवान खजिन्याची झलक पहायला मिळाली आहे.
जहाजात विखुरले गेलेले सोन्याचे तुकडे, तोफा आणि मातीची भांडी रोबोटिक चित्रणात दिसून आल्या आहेत. आम्ही हा खजिना पुन्हा मिळवू इच्छितो असे उद्गार कोलंबियाचे माजी अध्यक्ष इवान डय़ुक यांनी काढले आहेत. स्पेनने दक्षिण अमेरिकेतील साम्राज्यादरम्यान किमान 200 टन सोने, चांदी आणि रत्नं स्वतःच्या राजाला पाठविली होती. इंग्रजांच्या विरोधातील लढाईसाठी या खजिन्याचा वापर केला जाणार होता.