पहिल्या 7 महिन्यातील कामगिरी ः रेल्वेची माहिती
नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात रेल्वेच्या मालवाहतुकीच्या महसुलात वार्षिक तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती रेल्वेने नुकतीच दिली आहे.
रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल-ऑक्टोबर 2022 या कालावधीत मालवाहतुकीतून एकूण 92,345 कोटी रुपये कमावले आहेत, जे एका वर्षापूर्वीच्या 78,921 कोटी रुपयांपेक्षा 17 टक्के जास्त असल्याचीही माहिती दिली आहे.
रेल्वेच्या मालवाहतुकीतही वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात, रेल्वेने एकूण 85.56 कोटी टन वजनाची वाहतूक केली, जी मागील वर्षी याच कालावधीत 78.62 कोटी टन राहिली होती.
त्याचवेळी, मासिक आधारावर, रेल्वेने ऑक्टोबरमध्ये 11.89 कोटी टन मालाची वाहतूक केली जी ऑक्टोबर 2021 मध्ये 11.73 कोटी टन होती. अशा प्रकारे, ऑक्टोबर महिन्यात मालवाहतुकीमध्ये 1.4 टक्के वाढ नोंदवली गेली. रेल्वेने गेल्या महिन्यात मालवाहतुकीतून 13,353 कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जो एका वर्षापूर्वीच्या 12,313 कोटी रुपयांच्या तुलनेत 8 टक्क्यांनी अधिक आहे.
‘हंग्री फॉर कार्गो’ योजनेला याचे श्रेय देत रेल्वेने सांगितले की, स्पर्धात्मक दरात मालवाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे रेल्वेला पारंपारिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या मालवाहतुकीत वाढ होण्यास मदत झाली आहे.