युक्रेन लष्कराचा दावा : रशियाने पुन्हा आक्रमकता वाढवली
किव्ह, मॉस्को / वृत्तसंस्था
रशिया-युपेन युद्धाला 50 दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत. आतापर्यंत रशियन सैन्याला खूप नुकसान झाले असून त्यांनी युद्धात आपले 20 हजार 300 सैनिक गमावले आहेत. तसेच त्यांची 165 विमाने, 146 हेलिकॉप्टर, 773 रणगाडे, चार क्षेपणास्त्र प्रक्षेपक यंत्रणा नष्ट करण्यात आल्याचा दावा युपेनच्या लष्कराने केला आहे. याचदरम्यान, युपेनचा बदला घेण्यासाठी रशियाने किव्ह, खार्किवसह आठ शहरांमध्ये आक्रमकता वाढवली असून रशियाने किव्हजवळील युपेनचा लष्करी कारखाना उद्ध्वस्त केला. युपेनियन सैन्याच्या पलटवारात आणखी एक रशियन जनरल मारला गेला. लष्करी मेजर जनरल व्लादिमीर फ्रोलोव्ह हे युद्धात हुतात्मा झाले. शनिवारी सेंट पीटर्सबर्ग येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युपेन युद्धात आतापर्यंत 7 रशियन जनरल मारले गेले आहेत.
ब्रिटन पंतप्रधानांवर रशियाकडून बंदी
पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांना प्रत्युत्तर देताना रशिया कठोर कारवाई करत आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि परराष्ट्र सचिव लिझ ट्रुस यांच्यासह 10 ब्रिटिश राजनयिकांवर बंदी घातली आहे. आता हे लोक रशियात प्रवेश करू शकणार नाहीत. ब्रिटनच्या रशियाविरोधी वृत्तीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, नाटो आणि युरोपियन युनियनही रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्याची तयारी केली आहे.