काबूल / वृत्तसंस्था
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केले. या बॉम्बहल्ल्यात 5 मुले आणि 1 महिला ठार झाली. तथापि, हा हल्ला खोस्टच्या स्पेरा जिह्यात झाला असून त्यामध्ये 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या लोकांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा निषेध केला. या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हवाई हल्ले करून हल्ला केल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.
हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अफगाणमधील तालिबान सरकारने पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांना पाचारण करत सक्त ताकीद दिली आहे. याप्रसंगी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी आणि उपसंरक्षण मंत्री अलहाज मुल्ला शिरीन अखुंद उपस्थित होते.
संयमाची परीक्षा पाहू नका ः तालिबान
तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिद यांनी ट्विट करून पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानच्या संयमाची परीक्षा पाहू नये अशी समज देताना अशी चूक पुन्हा झाली तर त्याचे वाईट परिणाम होतील. दोन्ही देशांमधील समस्या राजकीय मार्गाने सोडवल्या पाहिजेत, असे तालिबानी प्रवक्त्याने म्हटले आहे.