कुडची पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
निलजी (ता. रायबाग) येथे उसाच्या मळय़ात पिकविण्यात आलेला 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली कुडची पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी हणमंत संत्राम अक्केण्णावर (वय 45, रा. सुट्टट्टी, ता. रायबाग) या युवकाला अटक करण्यात आली आहे. निलजी येथील उसाच्या मळय़ात त्याने गांजा पिकविला होता. यासंबंधीची माहिती मिळताच अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, हारुगेरीचे पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज धरीगोन व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या 25 किलो कच्च्या गांजाची किंमत 50 हजार रुपयांइतकी होते. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या हणमंतवर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.