श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिह्यातील बास्कुचन गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सोमवारी रात्री उशिरा चकमक झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांचे संयुक्त पथक या कारवाईत गुंतले होते. या कारवाईदरम्यान संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. येथे तीन दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर चकमक सुरू झाली होती. यामध्ये स्थानिक दहशतवादी आदिल वानी अडकल्याचीही शक्मयता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा दलांना गुप्तचर विभागाकडून बास्कुचनमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सदर भागात फौजफाटा दाखल होताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली होती.