प्रतिनिधी / बेळगाव
मूळचा बेळगावचा व सध्या मुंबई पणवेल येथे राहणारा चित्रकार केविन डायस या विद्यार्थ्याला रेसिडेन्सीयल आर्ट लॅन्डस्केप पेंटिंग कॅम्प’साठी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ऑनलाईन कला स्पर्धेत केविनने काश्मीर या विषयावर रेखाटलेल्या चित्राला ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 70 प्रवेशिका आल्या होत्या. केविन याने यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळविले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल इंडिया चित्रकला स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला. तर पर्यटन मंत्रालय, क्रीडा मंत्रालय व भारत सरकार आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांकाचा व अलिबाग येथील नेहरु युवा केंद्र आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे.