विटा घेऊन जाणारा मालवाहू ट्रक अचानक कलंडून एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे.
खानापूर तालुक्यातील देवट्टीहुन पारिश्वाडला विटा घेऊन जात असलेला मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. दावलसाब फयाझ मुनवळ्ळी अशी मृताचे ओळख पटली असून, चालक मंजुनाथ चंद्रू कुकडोळळी आणि कामगार मंजुनाथ गुरन्नवर या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींवर इस्पितळात उपचार सुरु आहे. या अपघातात ट्रक मधील विटा संपूर्ण नष्ट झाले आहेत. संबंधीत पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास करण्यात येत आहे.