अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय, 19 ऑगस्टपासून सेवा सुरू
प्रतिनिधी/खेड
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडून गणपती स्पेशल गाड्यांची खैरात सुरू झालेली असतानाच रोहा-चिपळूण मार्गावर 32 मेमू सेवा (विजेवर चालणाऱ्या) चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 19 ऑगस्टपासून या फेऱ्या धावणार आहेत. या फेऱ्यांमुळे गणेशोत्सवात धावणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या 198 वर पोहचणार आहे.
सलग दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवात गावी येण्याची चाकरमान्यांची संधी हुकली होती. यंदा मात्र ही कसर भरून निघणार असून गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. नियमित
गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल होताच चाकरमान्यांच्या नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे खिळलेल्या असतानाच रेल्वे प्रशासनाने सर्वप्रथम गणपती स्पेशलच्या 72 फेऱ्या जाहीर करत सुखद धक्का दिला होता. त्यापाठोपाठच गणपती स्पेशलच्या 32 फेऱ्यांची घोषणा केलेली असतानाच त्यात आणखी 60 फेऱ्यांची भर पडल्याने चाकरमानी कमालीचे सुखावले होते.
हे हा वाचा : Ratnagiri : चिपळुणात नवविवाहितेची माहेरी आत्महत्या
गणेशोत्सवात रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने रोहा-चिपळूण दरम्यान, 32 मेमू सेवा जाहीर केल्या आहेत. 01157 कमांकाची मेमू 19 ते 21 ऑगस्ट, 27 ऑगस्ट ते 5
सप्टेंबर, 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर यादरम्यान धावणारी ही मेमू रोहा येथून दररोज सकाळी 11.05 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता चिपळूण येथे पोहचेल. परतीच्या पवासात चिपळूण येथून दुपारी 1.45 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी सायंकाळी 4.10 वाजता रोहा येथे पोहचेल. माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड येथेही थांबे आहेत.