जुळे भाऊ किंवा बहिणी परस्परांना अनेक वर्षांनी भेटत असल्याचे चित्रपटांमध्ये दाखविले जाते. पण अशी घटना खरोखरच घडली आहे. दोन जुळय़ा बहिणी परस्परांना 36 व्या जन्मदिनीच भेटल्या आहेत.
ही घटना दक्षिण कोरियातील दोन बहिणींशी संबंधित आहे. या दोन्ही बहिणींना अमेरिकेच्या वेगवेगळय़ा कुटुंबांनी दत्तक घेतले होते. दोघीही बालपणीच परस्परांपासून दूर गेल्या होत्या.
या दोन्ही बहिणींचे नाव मौली सिनर्ट आणि एमिली बुशनेल आहे. दोन्ही बहिणींना आपण जुळय़ा आहोत याची कल्पना नव्हती. तसेच स्वतःच्या पार्श्वभूमीबद्दल त्यांना अधिक माहिती नव्हती. या दोन्हींची ही भेट त्यांच्या जन्मानंतरची पहिलीच भेट आहे.
दोघींनाही अलिकडेच परस्परांविषयी माहिती मिळाली होती. ही माहिती एका सामायिक मित्राच्या माध्यमातून प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांची ही भेट झाली आहे. या भेटीचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
आपल्याला एक जुळी बहिण आहे हे जाणून घेणे दोघींसाठी एक सरप्राइजच होते. दोघींनी भेटल्यावर 36 वा वाढदिवस एकत्रच साजरा केला आहे. सिनर्ट आणि एमिली यांच्या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या भेटीदरम्यान बुशनेल यांची 11 वर्षीय मुलगी इसाबेलही उपस्थित होती. बुशनेल यांना पेन्सिल्वेनियात एका ज्यू कुटुंबाने दत्तक घेतले होते.