जगभरात दरवर्षी कोटय़वधी पुस्तके वाचली आणि खरेदी केली जातात. जगातील सर्वात खरेदी केल्या जाणाऱया 5 पुस्तकांबद्दल जाणून घेणे रंजक ठरणार आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण या पुस्तकांना पसंत करतात.
डॉन क्विक्सोटे
डॉन क्विक्सोटे ही एक इतिहासाशी संबंधित कादंबरी असून स्पेनचे मिगुएल डे सवेंटेस यांनी ती लिहिली होती. ही कादंबरी 1605 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली होती आणि स्पेनमध्ये ‘इंगेनियोस हिदाल्गोस’ या नावाने या कादंबरीला ओळखले जाते. 1605 पासून आतापर्यंत जगभरात याच्या 500 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/03/harry-potter-1.jpg)
ए टेल ऑफ टू सिटीज
ए टेल ऑफ टू सिटीज ही ऐतिहासिक कादंबरी असून चार्ल्स डिकेन्स तिचे लेखक आहेत. 1859 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली होती. या कादंबरीत डिकेन्स यांनी प्रेंच क्रांतीदरम्यान लंडन आणि पॅरिसमधील एका स्थानाचे वर्णन केले आहे. या कादंबरीत तीन मुख्य पात्रं चार्ल्स डार्ने, लुसी मेनेट अणि सिडनी कार्टने असून प्रेंच क्रांतीदरम्यान त्यांच्या जीवनात होणारे बदल यात मांडलेले आहेत. ए टेल ऑफ टू सिटीज ही चार्ल्स डिकेन्स यांची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कादंबरी आहे. जगभरात याच्या 200 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.
द लिटिल प्रिन्स
एंटोनी डी सेंट-एक्सुप्री यांनी लिहिलेली ही कादंबरी 1943 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. जगभरात याच्या 200 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. एका युवा राजपुत्रासंबंधीची कहाणी यात नमूद आहे. राजपुत्र ब्रह्मांडातील विविध ग्रहांचा दौरा करत जीवनासाठीचा आवश्यक धडा शिकत असल्याचे यात लिहिले गेले आहे.
हॅरी पॉटर
जे.के. राउलिंग यांची हॅरी पॉटर सीरिज अत्यंत लोकप्रिय आहे. जगभरात याच्या 120 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक एक युवा जादूगार, हॅरी पॉटर आणि त्याच्या मित्रांवर आधारित आहे.