शिवसेनेकडे 22 ग्रामपंचायती : काँग्रेस, राष्ट्रवादीचा धुव्वा : महाविकास आघाडीला मोठा धक्का
- महाविकास आघाडीला एक ग्रामपंचायत
- ग्रामविकास पॅनेलना तीन ग्रामपंचायती
- इन्सुली, गोवेरी ग्रा. पं. मध्ये त्रिशंकू स्थिती
- नारायण राणे यांचा करिष्मा कायम
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात पार पडलेल्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपने 42 ग्रामपंचायतींवर कमळ फुलवत जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला 22, महाविकास आघाडीला केवळ एक, ग्रामविकास पॅनेलना तीन, तर दोन ठिकाणी त्रिशंकू अवस्था राहिली. भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आपला करिष्मा कायम ठेवल्याचेही स्पष्ट झाले. महाविकास आघाडीमधील काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसचा पुरता धुव्वा उडाला.
देवगड तालुक्मयातील मोंड ग्रामपंचायत शिवसेना व राष्ट्रवादीकडे गेल्याने महाविकास आघाडीला एकमेव ग्रामपंचायत मिळवता आली, तर तीन ठिकाणी ग्रामविकास पॅनेलचा विजय झाला. इन्सुली व गोवेरी या दोन ग्रामपंचायतींची त्रिशंकू स्थिती राहिली असून तेथे अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या राहिल्या आहेत.
जिल्हय़ातील 431 ग्रामपंचायतींपैकी पाच वर्षांची मुदत संपणाऱया 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारी रोजी झाल्या. त्यामध्ये चार ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 66 ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन सोमवारी प्रत्येक तालुक्मयाच्या ठिकाणी मतमोजणी झाली व निकाल जाहीर करण्यात आले.
भाजपचे खासदार नारायण राणे ज्या पक्षात असतील, त्या पक्षाकडे ग्रामपंचायती अधिक अशी यापूर्वी स्थिती असायची. परंतु गेल्या पाच, सहा वर्षांत शिवसेनेने जिल्हय़ात मोठी ताकद निर्माण केली. नारायणे राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याने ग्रामपंचायतींवर कोण वर्चस्व मिळवतो, याची उत्सुकता होती. राणेंनी आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे या निकालाने स्पष्ट झाले.
70 पैकी 42 ग्रामपंचायती भाजपकडे
बिनविरोध झालेल्या चार ग्रामपंचायतींसह 70 ग्रा. पं. निवडणुकीत 42 ग्रा. पं. वर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. शिवसेनेला 22 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवता आला. देवगड तालुक्मयातील मोंड ही एकमेव ग्रामपंचायत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीला मिळवता आली. तीन ग्रामपंचायतींवर गावविकास पॅनेलला विजय मिळवता आला. दोडामार्ग तालुक्मयातील आयनोडे-हेवाळे, देवगड तालुक्मयातील रहाटेश्वर आणि सावंतवाडी तालुक्मयातील दांडेली या ठिकाणी गावविकास पॅनेलनी बाजी मारली. सावंतवाडी तालुक्मयातील इन्सुली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना व भाजपला समान जागा व एक अपक्ष निवडून आल्याने त्रिशंकू अवस्था आहे. कुडाळ तालुक्मयातील गोवेरी ग्रामपंचायतीमध्येही त्रिशंकू स्थिती राहिली.
नीतेश राणेंचे वर्चस्व, वैभव नाईक, केसरकरना धक्का
भाजप आमदार नीतेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीनही तालुक्मयांतील एकूण ग्रामपंचायतींपैकी 27 ग्रामपंचायतींवर कमळ फुलवत मोठे यश मिळवले.
आमदार वैभव नाईक यांना मात्र मोठा धक्का असून त्यांच्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी फक्त सहा ग्रामपंचायतींवर भगवा फडकवता आला. आमदार दीपक केसरकर यांनाही सावंतवाडी मतदारसंघात धक्का बसला असून 17 ग्रामपंचायतींपैकी फक्त सहा ग्रामपंचायतींवर भगवा फडकवता आला.
भाजपची सरशी
ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवली जात नसली, तरी पुढील वर्षभरात होऊ घातलेल्या वैभववाडी, दोडामार्ग आणि देवगड नगरपंचायत निवडणुका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. यामध्ये भाजप सरस ठरली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असूनही मोठे यश मिळवता आले नसल्याने पुढील निवडणुकासाठी त्यांना धोक्मयाचा इशारा मिळाला आहे.
काहींनी गड राखले, काहींना धक्का
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आपल्या गावच्या भिरवंडे ग्रामपंचायतीवर भगवा फडकावत ती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी शिवसेनेचे जि. प. सदस्य मायकेल डिसोझा यांना धक्का देत ग्रामपंचायतीवर कमळ फुलवले आहे. तर देवगड तालुक्मयात नाडण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जि. प. चे माजी सदस्य बाळकृष्ण झरकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
70 ग्रा. पं. चा तालुकानिहाय पक्षीय निकाल
तालुका भाजप शिवसेना महाविकासआघाडी ग्रामविकास त्रिशंकू
वैभववाडी 09 04 00 00 00
मालवण 05 01 00 00 00
वेंगुर्ला 01 01 00 00 00
कणकवली 01 02 00 00 00
दोडामार्ग 00 02 00 01 00
कुडाळ 03 05 00 00 01
देवगड 17 04 01 01 00
सावंतवाडी 06 03 00 01 01
एकूण 42 22 01 03 02
सावंतवाडी : भाजप सहा, शिवसेना तीन, ग्रामविकास पॅनेल एक, त्रिशंकू एक
सावंतवाडी :मळगाव – भाजप, इन्सुली – त्रिशंकू, चौकुळ – भाजप, मळेवाड – भाजप, आंबोली – भाजप, तळवडे – शिवसेना, दांडेली – भाजप, आरोस – शिवसेना, आरोंदा – शिवसेना, डिंगणे – ग्रामविकास, कोलगाव – भाजप.
वैभववाडी : भाजप नऊ, शिवसेना चार.
वैभववाडी : सांगुळवाडी – भाजप, नाधवडे – भाजप, सोनाळी – शिवसेना, कुंभवडे – शिवसेना, ऐनारी – भाजप, लोरे नं. 2 – शिवसेना, कोकिसरे – भाजप, वेंगसर – भाजप, मांगवली – भाजप, भुईबावडा – भाजप, खांबाळे – शिवसेना, आचिर्णे – भाजप, एडगाव – भाजप.
मालवण : भाजप पाच, शिवसेना एक
मालवण : कुणकवळे – भाजप, मसदे (चुनवरे) – भाजप, गोळवण (कुमामे) – भाजप, खरारे-पेंडूर – भाजप, आडवली (मांडली) – शिवसेना, चिंदर – भाजप.
वेंगुर्ले : शिवसेना एक व भाजप एक
वेंगुर्ले : सागरतीर्थ : शिवसेना, आरवली – भाजप.
कणकवली : शिवसेना दोन, भाजप एक
कणकवली : भिरवंडे – शिवसेना, तोंडवली-बावशी – भाजप, गांधीनगर- शिवसेना.
दोडामार्ग : शिवसेना दोन, ग्रामविकास एक
दोडामार्ग : तेरवण (मेढे) – शिवसेना, आयनोडे (हेवाळे) – ग्रामविकास, कुडासे – शिवसेना.
कुडाळ : शिवसेना पाच व भाजप तीन, त्रिशंकू एक
कुडाळ : गोवेरी – त्रिशंकू, वाडोस – भाजप, गोठोस – भाजप, आकेरी – शिवसेना, गिरगाव-कुसगाव – शिवसेना, कुपवडे – भाजप, वसोली – शिवसेना, पोखरण-कुसबे – शिवसेना, माडय़ाचीवाडी – शिवसेना.
देवगड : भाजप सतरा, शिवसेना चार, महाविकास आघाडी एक, गावविकास एक
देवगड : धालवली – शिवसेना, गढीताह्माणे – भाजप, इळये – भाजप, कातवण – भाजप, कोर्ले – भाजप, कुणकेश्वर – भाजप, लिंगडाळ – भाजप, मिठबाव – भाजप, मेंड – महाविकास आघाडी, मोंडपार – भाजप, मुणगे – भाजप, मुटाट – भाजप, नाडण – भाजप, पाळेकरवाडी – शिवसेना, पाटथर – भाजप, पुरळ – शिवसेना, रहाटेश्वर – गावविकास पॅनेल, शिरगाव – भाजप, तळवडे – भाजप, तांबळडेग – भाजप, टेंबवली – भाजप, वाडा – शिवसेना, वरेरी – भाजप.