सरव्यवस्थापक संजय घाटे यांची माहिती
प्रतिनिधी /पर्वरी
आंतरराष्ट्रीय मनोहर (मोपा) विमानतळ दि.5 जानेवारीपासून सुरु होत आहे. त्यासाठी कदंब वाहतूक मंडळातर्फे 49 आसनांच्या इलेक्ट्रकि बसेस रुजू करण्यात येणार असून मोपा व्यवस्थापनाने आम्हाला कल्पना दिली असून पहिल्या दिवशी अकरा ते बारा विमाने येणार असून तेवढीच विमाने परतणार आहेत. पहिले विमान सकाळी 9 वाजता येणार असून कदंब बस सकाळी 9.30 वाजल्यापासून सेवेत रुजू होणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तासागणिक बसेस सोडण्यात येणार आहेत. मोपा व्यवस्थापनाने सूचित केल्याप्रमाणे दि.31 जानेवारीपासून सुमारे 34 विमाने येणार असून तितकीच विमाने परत जाणार आहेत. त्यानुसार अधिक मागणी असल्यास आम्ही बसेसची संख्या वाढवणार आहोत. असे कदंब वाहतूक मंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी मंगळवारी (दि.3) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
कदंब वाहतूक मंडळातर्फे पुढीलप्रमाणे दर ठरविण्यात आले आहेत. मडगाव ते मोपा व्हाया पणजी रु.500/- प्रत्येकी – 3 बसेस मोपा ते पणजी व्हाया म्हापसा रु.250/- प्रत्येकी – 3 बसेस मोपा ते सिकेरी व्हाया कळंगुट रु.250/- प्रत्येकी – मोपा ते म्हापसा= रु.200/-प्रत्येकी
पणजी, म्हापसा, कळंगुट आणि मडगाव या मार्गावर अर्ध्या तासाच्या अंतराने बसेस सोडण्यात येतील. सुरुवातीच्या आठ दिवसात परिस्थिती पाहून आणि विमानांची येण्याची संख्या वाढल्यास बसेसची संख्या वाढवण्यात येईल, असे घाटे यांनी पुढे सांगितले.