स्टॅण्डची अधिसूचना निघेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही : मोपा विमानतळावरुन काढलेल्या कामगारांचाही त्यांना पाठिंबा
प्रतिनिधी /पेडणे
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पिवळ्य़ा – काळ्य़ा टॅक्सीसाठी खास स्टॅण्ड उपलब्ध करून द्यावा आणि तोही अधिसूचित करणारी अधिसूचना जारी करुन मंजूर करून कायदेशीररित्या दिल्यानंतरच धरणे आंदोलन मागे घेण्यात येईल अन्यथा आंदोलन याही पुढे असे चालू राहणार आहे. पेडणे तालुक्मयातील सर्व पिवळ्य़ा – काळ्य़ा टॅक्सी व्यावसायिकांना टॅक्सी स्टॅन्ड उपलब्ध करावा व इतर मागण्यांसाठी नागझर येथे सोमवार दि. 2 पासून सुरु केलेले धरणे आंदोलन दुसऱयाही सुरू होते.
स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी काही सरपंचांसह आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचा उपाय सूचविला. त्यानुसार आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा केली. या चर्चेत पिवळ्य़ा – काळ्य़ा टॅक्सींसाठी मोपा विमानतळावर स्टॅण्ड मंजूर करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. परंतु, किती टॅक्सी लावायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपल्या निर्णयाशी ठाम राहून पेडणे तालुक्यातील सर्व पिवळ्य़ा – काळ्य़ा टॅक्सी त्या स्टॅण्डवर लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. दुसऱयाही दिवशी आंदोलनकर्त्यांनी तीच मागणी पुढे रेटत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
आमच्यावर कितीही तक्रारी नोंदवा परंतु आम्ही आमच्या मागण्यापासून दूर हटणार नाही. टॅक्सी हा एकमेव व्यवसाय गोमंतकियांच्या हातात असून तो हिसकावू नये. आम्हाला सरकारी नोकऱया नको किंवा आम्ही सरकारकडे आम्हाला अनुदान मागत नाही आहोत. केवळ पिवळ्य़ा – काळ्य़ा टॅक्सी स्टॅण्डची करतोय. ही मागणी आजही सरकार मान्य करत नसल्याने व्यावसायिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.
कामगारांचाही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा
टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलन समर्थकांना मोपा विमानतळावर मेघा व्हाईट या कंपनीमध्ये काम करणाऱया आणि त्यांना हल्लीच कामावरून काढून टाकल्यामुळे तेही कामगार संतप्त बनले. दि. 3 रोजी या कामगारांनी या टॅक्सी व्यावसायिकांना पाठिंबा देत आम्हालाही सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी केली. या कामगारांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही मागच्या दोन वर्षापासून मेघा व्हाईट या कन्स्ट्रक्शन करणाऱया कंपनी सोबत कॉन्ट्रक्ट पद्धतीने काम करत होतो. दोन वर्षे आमच्याकडून या कंपनीने काम करून घेतले आणि आता काढून टाकले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी या कामगारांनी केली.
यावेळी बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणेकर यांनी आपला पाठिंबा या टॅक्सी व्यावसायिक आंदोलन समर्थकांना देताना सांगितले, सरकारने दूरदृष्टी ठेवून ज्या मागणीसाठी आंदोलनकर्ते आज रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची सरकारने मागणी त्वरित मान्य करावी, असे ते म्हणाले.