ग्रामीण भागात 3 लाख 30 हजार 767 व महापालिका क्षेत्रात 1 लाख 69 हजार 233 ध्वज पोहोच
प्रतिनिधी/कोल्हापूर
शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घराव तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. त्यासाठी जिह्याच्या मागणीनुसार 5 लाख तिरंगा ध्वज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले. त्यातील 3 लाख 30 हजार 767 तिरंगा ध्वज ग्रामीण भागात तर 1 लाख 69 हजार 233 ध्वज हे महापालिकेकडे वितरित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय व रेशन दुकाने व महापालिका क्षेत्रात विभागीय कार्यालये, रेशन दुकाने येथे विक्री केली जात आहेत.
जिह्यासाठी 9 लाख 37 हजार 904 इतके तिरंगा ध्वजांची मागणी आहे. यातील 5 लाख ध्वज राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आले आहे. उर्वरीत 4 लाख 37 हजार 904 ध्वजांचे स्थानिक स्तरावर नियोजन करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. शासनाकडून आलेल्या 5 लाख ध्वजांचे जिल्हा परिषदेच्या समन्वयातून तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 3 लाख 30 हजार 767 ध्वजांचा समावेश आहे. हे ध्वज पोस्ट कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये व रेशन दुकानांमधून विक्री केले जात आहेत. तसेच महापालिकेला 1 लाख 69 हजार 233 तिरंगा ध्वज वितरित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या यंत्रणेतून विभागीय कार्यालये, रेशन दुकाने येथून या ध्वजांची विक्री केली जात आहे.
जिह्यासाठी तिरंगा ध्वजाची मागणी राज्य शासनाकडे कळविण्यात आली होती. त्यानुसार 5 लाख तिरंगा ध्वज प्राप्त झाले असून ते ग्रामीण भागासाठी 3 लाख 30 हजार 767 व महापालिका क्षेत्रासाठी 1 लाख 69 233 अशा प्रमाणात वितरित करण्यात आले आहेत. वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
-अरुण जाधव, जिल्हा समन्वयक, हर घर तिरंगा उपक्रम
तिरंगा ध्वजांचे तालुकास्तरावरील वितरण असे
तालुका तिरंगा ध्वज वितरण
आजरा 20000
भुदरगड 20000
चंदगड 15000
गडहिंग्लज 25000
गगनबावडा 9767
हातकणंगले 40000
कागल 41000
करवीर 40000
राधानगरी 30000
शाहुवाडी 20000
शिरोळ 30000
पन्हाळा 40000