मोबाईलवर ऍप डाऊनलोड करायला भाग पाडून आयसीआससीआय बँकेतून काढले 5 लाखांचे कर्ज
रत्नागिरी प्रतिनिधी
महावितरणचा पुण्यातील अधिकारी असल्याचे सांगून वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत मोबाईलवर मेसेज करत शिवाजी नगर येथील मिहिलेची 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या बाबतची फिर्याद अशोक शांताराम धकाते (55) रा मुळ कृष्णपिंगाक्ष अपार्टमेंट देवानगर नागपूर सध्या रा. सिध्दीविनायक नगर, शिवाजीनगर ता. रत्नागिरी यांनी शहर पोलिसात दिली आहे.
याबाबत शहर पोलीस स्थानकातून दिलेल्या माहितीनूसार अशोक शांताराम धकाते यांच्या पत्नीच्या माबाईलवर वीजबील न भरल्याने वीजपुरवठा बंद करण्यात असल्याबाबत 9883964883 या मोबाईल कमाकांवरुन खोटा एसएमएस महिलेच्या मोबाईलवर पाठवला. मेसेज पाहून या महिलेने वरील मोबाईलवर फोन लावला समोरून बोलणाऱ्या राहुल गुप्ता असे नाव सांगणाऱ्या इसमाने तुमच्या लाईट बिलाचे ऑनलाईन सिस्टिममध्ये अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअरवर त्याने या महिलेला एक ॲप डाऊनलोड करुन ते इन्स्टॉल करावयास भाग पाडले. तसेच या महिलेकडून लाबाडीने त्यांचे डेबिड कार्डची माहिती घेऊन त्या आधारे धकाते यांच्या आयसीआयसीआय बँकेमध्ये त्यांचे नावे पर्सनल लोन अकाऊंट न एचपीएनएजी 00047388713 अन्वये 5 लाख रुपये काढून ते परस्पर ऑनलाईन प्रणालीद्वारे धकाते यांचे आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक 624201551390 या मध्ये जमा केले. व त्यांनतर ही रक्कम प्रथम शिवकुमार नावाच्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा करुन परत धकाते यांच्या खात्यावर परत केली व त्यानंतर मंजुदेवी यांचे बँक खात्यामध्ये अनुकमे 4 लाख 50 हजार प्रथम व पुन्हा 49 हजार रुपये असे ऑनलाईन ट्रांझेक्शन करुन मंजुदेवी यांच्या बँकेच्या खात्यात वळते करुन धकाते यांची फसवणूक केली आहे.
याबाबत शहर पोलीस स्थानकात राहुल गुप्ता, राहुल गुप्ताचा सिनीअर अधिकारी शिवकुमार व मंजुदेवी याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नं 03/2023 भा. द.वि.का.क.419,420,34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 सी पमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.