मिलान
सध्या सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी रोममध्ये झालेल्या इंग्लंड आणि युक्रेन यांच्यातील सामन्यावेळी इटलीच्या पोलिसांनी 52 फुटबॉल शौकिनांना कोरोना संदर्भातील नियमावलीमुळे प्रवेश नाकारला.
इंग्लंड आणि युक्रेन यांच्यातील हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविला गेला. दरम्यान विदेशातही कोरोनानंतर आता डेल्टा व्हेरिंयंटचा प्रसार होत असल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. विविध देशांनी हवाई प्रवासावरही निर्बंध घातले आहेत. या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने युक्रेनचा पराभव करून 25 वर्षांनंतर प्रथमच युरो चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.