स्वीमिंग पूल अन् डिस्कोची देखील सुविधा
पाळीव प्राण्यांबद्दल लोकांना प्रचंड प्रेम असते. चीनमधील एका उद्योजकाने स्वतःच्या घरात श्वान पाळले असून त्यांच्यासाठी त्याने एक मोठा बंगला तयार करवून घेतला आहे. या बंगल्यात सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत. या उद्योजकाचे नाव जोउ असून तो व्हिडिओ कंटेंट मेकिंग साइट ‘डाउयिन’वर स्वतःच्या श्वानांच्या आलिशान जीवनाशी निगडित व्हिडिओ अपलोड करत असतो.
या व्यक्तीकडे एकूण 10 श्वान असून तो शुई काउंटीमध्ये राहतो. त्याने या श्वानांसाठी एक मोठा बंगला तयार केला असून डॉग हाउस म्हणून त्याने तो स्वतःच्या श्वानांना गिफ्ट केला आहे.
33 वर्षीय जोऊ हे क्रेफिश इंडस्ट्रीत व्यवसाय करतात. श्वानांबद्दल मला विशेष आत्मियता असून लहानपणापासून मी एक आलिशान डॉगहाउस तयार करण्याचे स्वप्न बाळगून होतो. श्वानांच्या या घरात केवळ पारंपरिक केनलसारखा लुक नसून यात एअर कंडिशनर, टीव्ही सेट, वॉटर डिस्पेंसर, ड्रायर, एलिवेटर आणि टॉयलेट रुम तयार करण्यात आला आहे. श्वानांच्या मनोरंजनासाठी घरात फिल्म प्रोजेक्टर, स्लाइड्स, स्वीमिंग पूल आणि डिस्को रुम निर्माण करण्यात आला आहे. याचबरोबर फेरिस व्हील, टॉय कार आणि छोटे रीटेल बूथही निर्माण केले गेले आहे.
मी स्वतःसाठी महागडे कपडे आणि बॅग खरेदी करण्यावर खर्च करत नाही, परंतु श्वानांच्या सुविधांवर खर्च करण्यापूर्वी विचार करत नाही. डाउयिनवर या व्यक्तीचे 8.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 2019 मध्ये श्वानांसाठी तयार करण्यात आलेल्या घरामध्ये फॉलोअर्सच्या सुचनांनुसार 200 बदल केले असल्याचे जोउ यांनी सांगितले आहे. जोउ यांनी श्वानांसाठी एक पूल पार्टीही आयोजित केली, ज्यात श्वानांना बिकिनीमध्ये ड्रेस अप करण्यात आले. श्वानांसाठी जोउ यांचे प्रेम पाहून लोक अवाप् झाले आहेत.