ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोणतीही मागणी नसताना आम्ही कोरोना लसीचा 6 मिलियन अतिरिक्त साठा तयार करुन ठेवला आहे. युरोप आणि अमेरिकेत आपल्याकडील एकाच लसीला मान्यता आहे, परंतु, तिचीही मागणी आता खूप कमी आहे. लहान मुलांसाठी आवश्यक असलेली कोव्हक्स लस आपल्याकडे तयार आहे. आम्हाला मिळणारा पैसा आम्ही लसीच्या संशोधनासाठी वापरतो, असे सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.