राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्यास सक्षम असून त्यांच्याकडे प्रचंड प्रशासकीय अनुभव असल्याचे मत संजय राऊत यांनी मांडले आहे. काही दिवसापासून खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांनी एकमेकांवर केलेल्या टिकेनंतर प्रथमच संजय राऊत यांनी अजित पवार यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काही लोकांनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिऴवले असे म्हणुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली.
जळगावमध्ये एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही? आणि अजित पवार हे मुख्यमंत्री बनण्यास सक्षम आहेत. गेली अनेक वर्षे ते राजकारणात आहेत तसेच अनेकवेळा मंत्रीही होते. सर्वाधिक उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पण कितीही वेळा ? प्रत्येकाला वाटते की ते मुख्यमंत्री व्हावेत,”
पुण्यातील एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीतमध्य़े मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “होय, मला मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल”असे म्हणाले होते. त्यानंतर खा. राऊत यांचे विधान आले आहे. शेवटी त्यांनी अजित पवार यांनी आपली ही इच्छा पहिल्यांदाच व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.” अशी प्रतिक्रिया दिली.