वार्ताहर /केपे
केपे तालुक्यातील दोन पंचायतांत होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी एकूण सात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बार्से पंचायतीत प्रभाग 7 मधून एका मताने निवडून आलेले पंच व बाळ्ळी पंचायतीत प्रभाग 4 मधून निवडून आलेले पंच यांना सरकारी नोकरी मिळल्याने त्यांनी पंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या दोन्ही जागांवर पोटनिवडणुका होत असून उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या मंगळवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत बार्सेच्या प्रभाग 7 मधून दोन, तर बाळ्ळी पंचायतीच्या प्रभाग 4 मधून पाच उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.