विद्याधर पिंपळे / कोल्हापूर
स्वातंत्र्यकाळापूर्वी पेट्रोलची विक्री गॅलन (एक गॅलन पाच लिटर) ने होत होती. नावाला एखादा दुंसरा पंप असल्याने तसेच वाहने नसल्याने मागणीही नव्हती. पेट्रोलचा दर 70 ते 72 पैसे असा होता. पण आता 57 वर्षात पेट्रोलच्या दरात 126 टक्क्यांनी वाढून 72 पैसे लिटर असलेले पेट्रोलचा दर आता 90 रूपयापर्यंत पोचला आहे. क्रूडच्या दरावरच इंधनाचा दर ठरत असल्याने, या वर्षात (डिसेंबर 2020 अखेर) पेट्रोलचा दर शंभरीपर्यंत पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीपेक्षा अधिक केंद्र व राज्य शासनाचे विविध कर तसेच पेट्रोल-डिझेलचे रोज बदलणारे दर यामुळे पेट्रोल -डिझेलच्या दरात वाढ होऊ लागली आहे. या शेवटच्या वर्षाच्या पहिल्या आठवडयातच पेट्रोलने 90 चा तर डिझेलने 80 रूपयाचा टप्पा गाठला आहे. या दरवाढीमुळे वाहनधारकांचे आर्थिक गणित कोलमडून वाहतूकीचे दर वाढून महागाई वाढण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
गेल्या दोन वर्षांत प्रथमच पेट्रोल -डिझेलच्या दराने उच्चांकी दर गाठला आहे. लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर ठेवण्यात आला होता. पण एक जूनपासून पुन्हा एकदा याची दरवाढ सुरू झाली. मात्र 22 सप्टेंबरला या दरवाढीला ब्रेक मिळाला. पण पुन्हा एकदा 20 नोव्हेंबरपासून ही दरवाढ सुरू झाली. अवघ्या 17 दिवसात लिटरमागे पेट्रोल 2.35 तर डिझेल 3.15 पैश्यांनी महागले. सोमवारी कोल्हपूरात पैट्रोल 90.26 तर डिझेल 79.29 रूपये झाले आहे.
केंद्र व राज्य सरकारचे विविध कर हे मूळ किंमतीपेक्षा दुप्पट आहेत. यामुळे हे इंधन महाग होऊ लागले आहे. 1963 मध्ये कोल्हापूरात पेट्रोलचा 5 लिटरचा दर 3.60 पैसे म्हणजे 72 पैसे लिटर असा होता. पण आता विविध करामुळे ही दरवाढ होत आहे. कच्च्या प्रूड ऑईलचा दर दोन वर्षांत 48 वरून 80 डॉलर प्रतिबॅरल झाला आहे. केंद्र सरकारचा पेद्रोलवर 32.98 तर डिझ्sालवर 31.83 इतका उत्पादन शुल्क तर राज्य सरकारचा अनुक्रमे 26 व 24 टक्के व्हॅट व त्यावर 10.20 व 3 रूपये सेस लावला जात असल्याने ही दरवाढ झाली आहे.
या वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाही-गजकुमार माणगांवेः अध्यक्ष कोल्हापूर पेट्रोल-डिझेल असोसिएशन
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूडच्या दरात दिवसे दिवस वाढ होऊ लागली आहे. याचा फटका पेट्रोल-डिझेलच्या दराला बसत आहे. क्रूडच्या दरात कपात होयणची शक्यता नसल्याने या वर्षाअखेर हा दर चढाच राहणार आहे. लॉकडाऊन शिथील झाल्याने वाहनांची गर्दी ही वाढू लागल्याने इंधनांची मागणीही वाढत आहे.