तेल दर 110 डॉलर्सच्या घरात
नवी दिल्ली
जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाला आहे. जागतिक बाजारामध्ये कच्चे तेल (ब्रेंट क्रूड)चे भाव वधारुन 110 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. दुसऱया बाजूला आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने जगामध्ये ऊर्जेचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या कारणास्तव कच्च्या तेलाच्या पुरवठय़ावर हा सर्व परिणाम होत आहे. तसेच ज्या कच्च्या तेलाचे भाव 2014 नंतर सर्वाधिक उंचीवर पोहोचले आहेत. या परिस्थितीमुळे आगामी काळात पेट्रोल व डिझेलचे दर 25 रुपयांनी प्रति लिटर वाढत जाण्याची भीती आहे.
जागतिक ऍग्रीमेन्टनुसार कच्च्या तेलाचा पुरवठा न झाल्यास वेगळी परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही अभ्यासक व्यक्त करत आहेत. जपान, अमेरिकेसह आयइएचे सदस्य आपल्या आरक्षित साठय़ामधील 6 कोटी बॅरेल तेल देण्याची तयारी दर्शवत आहेत. येणाऱया दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती आणखीन वाढण्याची शक्यता जागतिक पातळीवर अभ्यासक व्यक्त करत आहेत.
अन्य बाबी
? ग्लोबल फर्म गोल्डमॅन सॅश, मॉर्गन स्टेनलीसह जेपी मॉर्गन यांनी कच्चा तेलाच्या किमतीवर भाष्य केले आहे.
?सदरच्या एजन्सीनुसार 150 डॉलर प्रति बॅरेलवर जाण्याची भीती आहे.
?119 दिवस देशातील पेट्रोल व डिझेलचे किमती स्थिर राहिल्या आहेत.