पंढरपूर / प्रतिनिधी
सुगंधी चंदनाची ओली लाकडे वाहतुक करणार्या दोघांवरती पंढरपूर तालुका पोलिसांनी मंगळवार दि. 08 रोजी राञी 11 च्या दरम्यान कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 132 किलो 900 ग्रॅम सुगंधी चंदन 7 लाख 97 हजा 400 रुपये व कार असा एकूण 12 लाख 97 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भादवि कलम 379, 34 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, 66, 66 (अ) व महाराष्ट्र नियमावली 2014 नियम 82 व महाराष्ट्र अधिनियम कलम 29 प्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी पञकार परिषदेत दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर मोहोळ रोडवरील तीन रस्ता याठिकाणी वाहन तपासणी दरम्यान सिल्व्हर रंगाची इर्टीका कार (एम.एच 42 के 7611) मध्ये पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे आढळुन आली. यामध्ये एकुण चार नायलनच्या पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे 132 किलो 900 ग्रॅम (एकुण किंमत 7 लाख 97 हजार 400 रुपये) व एक सिल्व्हर रंगाची एरटिका कार (किंमत 5 लाख) असा एकुण 12 लाख 97 हजार 400 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चालक रमेश महादेव तेलंग (वय 25 वर्षे) रा.तुंगत ता.पंढरपूर जि.सोलापूर, कचरुद्दीन अल्लामीन जमादार (वय 35 वर्षे) रा.पेनुर ता.मोहोळ जि.सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे. वनपाल एस.एस.पत्की, वनरक्षक एस.डी.कांबळे यांनी सर्व मालाची पाहणी केली.