ट्रक्टर-ट्रॉलीवरून 46 जण करत होते प्रवास
लखनौ
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी लखनौपासून सुमारे 30 कि.मी. दूर असलेल्या इटौंजा येथे मोठी दुर्घटना घडली. दुर्गामाता उत्सवासाठी भाविकांना घेऊन जाणारी ट्रक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने सर्व 46 जण पाण्यात पडले. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्तांचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. इटौंजा ते कुम्हरावण मार्गावरील गद्दीनपुरवाजवळ हा अपघात झाला. हे सर्व लोक दुर्गामाता दर्शनासाठी जात होते. क्षमतेपेक्षा जास्त लोक ट्रक्टर-ट्रॉलीमध्ये बसल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.