चित्रपटाचा टीझर झळकला
उरी ः द सर्जिकल स्ट्राइक, काबिल आणि दसवी यासारख्या चित्रपटांमध्ये स्वतःच्या उत्तम अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री यामी गौतम लवकरच नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘चोर निकल के भागा’मध्ये दिसून येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. ऍक्शन आणि रोमांचने भरपूर या टीझरमध्ये यामी स्वतःसाठी लढताना आणि विमानातील प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. ‘स्वतःचा सीटबेल्ट लावून घ्या, कारण एक अत्यंत रोमांचाक चित्रपट भेटीला येतोय’ असे नेटफ्लिक्सने नमूद पेले आहे.
या चित्रपटात सनी कौशल एका उद्योजकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर यामी गौतम एअर होस्टेसची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कहाणी एका विमानाच्या अपहरणाची पार्श्वभूमी दर्शविणारी आहे. अजय सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
यामी याचबरोबर उमेश शुक्ला यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला चित्रपट ‘ओह माय गॉड 2’मध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय, यामीसोबत पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रटप ‘ओएमजी’चा सीक्वेल आहे.