भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील विदिशा, सतना आणि गुना जिह्यात शनिवारी सायंकाळनंतरच्या 24 तासांत वीज कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण जखमी झाले आहेत. विदिशामध्ये जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या गंजबासोडा तालुक्यामध्ये आगसोद गावात पावसादरम्यान झाडाखाली आश्रयासाठी उभे असताना शनिवारी संध्याकाळी वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. तसेच सतना येथे पोडी-पतौरा आणि जटवारा भागात वीज पडण्याच्या वेगवेगळय़ा घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि दोन अल्पवयीन मुले जखमी झाली. तर गुना येथे एक महिला दगावली आहे.