25 बळी, 1454 नवे रूग्ण, 1612 कोरोनामुक्त, शहरातील 6, परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू, सक्रीय रूग्णांमध्येही घट
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 454 नवे रूग्ण आढळून आले. कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 612 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 331 झाली आहे. कोरोनामुक्तांमध्ये वाढ होत असताना पॉझिटिव्ह रूग्ण, कोरोना मृत्यूंमध्ये, सक्रीय रूग्णसंख्येत घट होत आहे.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 945 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 659, नगरपालिका क्षेत्रात 716, शहरात 1 हजार 28 तर अन्य 542 आहेत. दिवसभरात 1 हजार 612 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 51 हजार 523 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 454 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 52, भुदरगड 40, चंदगड 42, गडहिंग्लज 73, गगनबावडा 5, हातकणंगले 126, कागल 78, करवीर 259, पन्हाळा 84, राधानगरी 54, शाहूवाडी 23, शिरोळ 116, नगरपालिका क्षेत्रात 36, कोल्हापुरात 351 तर अन्य 21 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 69 हजार 799 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 12 हजार 729 अहवाल आले. त्यापैकी 11 हजार 264 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 297 अहवाल आले. त्यातील 3 हजार 51 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 5 हजार 240 अहवाल आले. त्यातील 4 हजार 793 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 4 हजार 192 रिपोर्ट आले. त्यातील 3 हजार 420 निगेटिव्ह आहेत.
शहरातील कोरोनाने मृत्यू
परजिल्ह्यातील बेळगाव, जळगाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा तर कोल्हापूर शहरातील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूमध्ये दौलततगर, राजेंद्रनगर, मातंग वसाहत, कदमवाडी, नाना पाटील नगर, रंकाळा येथील व्यक्तींचा समावेश आहे.
टेस्ट संख्या पॉझिटिव्ह रूग्ण
आरटीपीसीआर टेस्ट 3229 235
ऍटीजेन टेस्ट 5240 447
ट्रुनेट टेस्ट 4192 772
एकूण टेस्ट 12729 11264
कोरोना रूग्ण 1454 : एकूण : 1,69,799
कोरोनामुक्त 1612 : एकूण : 1,51,523
कोरोना मृत्यू 25 : एकूण मृत्यू : 4945
सक्रीय रूग्ण : 13,331