बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्ण संख्येत घट होत आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३९ हजारांवर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात २,७४३ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर ३,०८१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात बुधवारी ७५ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.६४ टक्के होते. तर मृत्यू दर २.७३ टक्के होता.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,६२,३३८ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २७,८७,१११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,६०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३९,६०३ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ६११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी ६९३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात १२ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत १२,१७,५०७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ११,८७,६६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५,७०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७.६४ टक्के आहे. तर मृत्यू दर १.२८ टक्के आहे.