रस्ते पाण्याखाली : चोरला घाट परिसरात धुवाधार पर्जन्यवृष्टी,दरडी कोसळण्याची भीती.
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या 24 तासात सत्तरी तालुक्मयाला पावसाचा जोरदार तडाखा बसला. एकूण प्राप्त माहितीनुसार गेल्या 24 तासात एकूण सहा इंच पावसाची नोंद झालेली आहे .आज दिवसभर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या परिसरातील रहदारीचे रस्ते पाण्याखाली गेले होते .यामुळे वाहतूकीला बऱयाच प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला. तर वाळपई शहरातून अनेक ग्रामीण भागांमध्ये जाणाऱया रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्याची माहिती हाती आलेली आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार गोवा बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे या महामार्गावर दरड कोसळण्याची शक्मयता वर्तवली जात आहे .त्यामुळे सदर महामार्गावरून प्रवास करणाऱया वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी अशा प्रकारचे आवाहन महामार्ग यंत्रणेच्या व्यवस्थापनाने केले आहे.
याबाबतची माहिती अशी की गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. काल संध्याकाळपासून पावसाने पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केलेले आहे. आज दिवसभर सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात पाऊस लागला. खास करून वाळपई शहर व ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाल्याचे पहावयास मिळाले .यामुळे वाळपई शहर व अनेक ग्रामीण भागातील रस्त्यावर वाहतुकीला बऱयाच प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. आज दुपारी पुन्हा एकदा पावसाने आक्रमक रूप धारण केले .यामुळे वाळपई नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याचा साठा झाला होता. वाळपई होंडा मार्गावरील वनप्रशिक्षण व संशोधन केंद्र समोर रस्त्यावर जवळपास अर्धा मीटर पाण्याचा साठा झाला होता .यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले. जवळपास एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पाण्याचा साठा वारंवार होत असतो.
दरम्यान सदर ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पावसाळी मोसमामध्ये वारंवारपणे पाणी साचत असते. याठिकाणी रस्ता पाण्याखाली जात असल्यामुळे वाहनचालकांना सातत्याने समस्यांना तोंड द्यावे लागत असते. आजही अशाच प्रकारची परिस्थिती पहावयास मिळाली .दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रस्ता अर्धा मीटर पाण्याखाली गेला होता. त्यामुळे दुचाकी चालकाची गोची झाली. तरीसुद्धा काही दुचाकीचालकांनी धोका पत्करून सदर पाण्यातून वाहने काढण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेने याठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे होते. मात्र याकडे अजून पर्यंत लक्ष देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे सरकारी सामाजिक रुग्णालय समोरही पाण्याचा साठा झाला होता.
ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणी.
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वाळपई शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱया अनेक रस्त्यावर पाणी साठले होते. यामुळे गावाकडे जाणाऱया नागरिकांची धांदल उडाली होती. वाळपई ठाणे मार्गावरील कोपर्डे याठिकाणी पाणीसाठा झाला होता. यामुळे अनेक दुचाकी चालकांनी कोपर्डे गावातून जाणे पसंत केले. त्याचप्रमाणे वाळपई सोनाळ आदी मार्गावरही अनेक ठिकाणी पाणीसाठा झाला होता .यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण झाल्या.
चोरला घाटात धुवांधार पाऊस.
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चोरला घाट परिसरातील डोंगराळ भागामध्ये जोरदार पाऊस लागत आहे .गुरुवारी रात्री मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला. शुक्रवारी दिवसभर सदर भागांमध्ये पाऊस होता. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास सदर भागातील दरडी कोसळण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे सत्तरी उपजिल्हाधिकारी यंत्रणेने सदर भागातून वाहतूक करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलेले आहे. कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे सदर भागांमध्ये खास देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.