बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तर धोका अद्याप टळलेला नाही. पूर्ण लॉकडाऊननंतर राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजारावर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,८०६ नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर २,७४८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शुक्रवारी ४२ रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,८०,३७० लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,१२,८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,०७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३१,३९९ इतकी आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.१८ टक्के होते. तर मृत्यू दर १.२५ टक्के होता. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७.६५ टक्के आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच जिल्ह्यात १० कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत १२,२१,३७१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ११,९३,२१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५,७८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७.६९ टक्के आहे. तर मृत्यू दर १.२९ टक्के आहे.