बेंगळूर/प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे गुरुवारी कर्नाटकातील साकलेशपूर तालुक्यातील डोनिगळजवळ राष्ट्रीय महामार्ग ७५ वर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या दरडीमुळे बेंगळूर-मंगळूर महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामार्गावरून होणारी वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, बेंगळूर-मंगळूरकडे जाणारी हलकी वाहने बिस्ले घाट मार्गे तर भारी वाहने चर्माडी घाट किंवा मडिकेरी-पुत्तूर मार्गावर वळविण्यात आली आहेत.
दरम्यान, गुरुवारी कोडगू जिल्ह्यात आणि मलनाड भागातील काही भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. कावेरी नदीला पाणी आल्याने खालचा बालामुरी पूल पाण्याखाली गेला आहे. भागमंडळामध्ये मुसळधार पावसामुळे त्रिवेणी संगम भरकटला आहे.