दापोली / प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या बहुचर्चित दापोली तालुक्यातील मुरुड येथे पाडायला घेतलेल्या बंगल्याची भाजपचे खासदार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाहणी केली. आज दि. 23 रोजी दुपारी सोमय्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली.
मिलिंद नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करायला लागू नये याकरिता उद्धव ठाकरे यांनीच त्यांना बंगला पाडून टाकायला सांगितला असल्याचा घणाघाती बंगला तोडावा या करिता आपण आंदोलनाचा इशारा दिला होता, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलताना दिली.
मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडला, आता पालकमंत्री अनिल परब यांचे बेकायदा रिसॉर्ट कधी पाडणार? असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.