नाशिक \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुणे, नाशिक, महाड आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्याने चारचाकी कार्यालयातून आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत काचा फोडल्या आणि तेथून निघून गेले. आमच्या कुटुंबप्रमुखाचा अपमान झाला असल्याचं यावेळी एका खा वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. दरम्यान महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणं आवश्यक आहे. यासाठी पोलीस उप-आयुक्त दर्जा अधिकार नेमणे उपयुक्त असल्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकंडू यांना नारायण राणेंना अटक करण्यासाठी नेमलं आहे. तसेच त्यांना एक पोलिसांचे पथक तयार करून नारायण राणेंना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.