प्रतिनिधी /बेळगाव
तालुका पंचायतमध्ये समांतर फंड म्हणून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सर्व तालुका पंचायत सदस्यांना हा फंड वितरीत करण्यात आला. मात्र काहींनी आराखडे तयार करुन कामाला सुरूवात केली. मात्र अजूनही काही ठिकणी कामे सुरू करणे बाकी आहे. मात्र याचाच फायदा घेत ग्रामीण आमदारांच्या पीएने यामध्ये ढवळाढवळ केली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत गांभीर्याने घेवून संबंधितांना समज द0यावी, अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव तालुका पंचायतमध्ये याआधी 15 वित्त आयोगातून निधी मंजूर झाला होता. सर्व सदस्यांच्या कार्यकाळ संपणार याआधी समांतर फंड आला. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा कामे करण्याची संधी मिळाली आहे. मात्र काही राजकीय वजन वापरुन अनेक सदस्यांचा निधी आमदारांच्या नावावर खपविण्यासाठी त्यांच्या पिएंनी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आले. सदस्यांनी कामांचा आरखडा देवूनही तो रद्द करण्यात आला आहे. त्यावर ग्रामीण आमदारांच्या नावे आपला मनमानी कारभार सुरू केला असून तो प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे.
बेळगाव तालुक्मयातील काही गावांत असे प्रकार करण्यात धन्यता मानण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकार अन्यायकारक आहेत. ग्रामीण आमदारांच्या एका पिएने हा कारभार केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या कारभाराला माजी तालुका पंचायत अध्यक्षही कारणीभूत असल्याचे समजते. तेंव्हा केवळ निधीतील कमिशन हडप करण्यासाठी हा सारा प्रकार असून ज्या सदस्यांचा निधी लाटण्याचा प्रयत्न ओ त्यांनाच तो निधी परत काम करण्यासाठी द्यावा, अशी मागणी होत आहे.
तालुका पंचायत सदस्यांना विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. त्यातच आमदारांच्या पिएनी केवळ मराठी तालुका पंचायत सदस्यांचाच निधी आमदारांच्या नावाने वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात तालुका पंचायतमधील अभियंतेही त्यांच्या पाठराखण करत आहेत. तेंव्हा अभियंत्यांनाही चांगलीच अद्दल घडविणे गरजेचे आहे. अनेक अभियंत्यांनी विकासाचे गाजर दाखवून कमिशनवर मोठी माया जमविल्याचा आरोपही यावेळी संबंधित सदस्यांनी केला. तेंव्हा याबाबत गांभीर्याने घेवून तो निधी संबंधित माजी तालुका पंचायत सदस्यांना परत मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याशी चर्चा करुन संबंधितांना समज देण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, रावजी पाटील, नारायण नलवडे, वसंत सुतार, आप्पासाहेब किर्तने, नीना काकतकर, लक्ष्मी मेत्री, मधुरा तेरसे आदी सदस्य उपस्थित होते.
नूतन कार्यकारी अधिकाऱयांचा सत्कार
यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी म्हणून राजेश दनवाडकर यांची नियुक्ती झाली. यावेळी सर्व मराठी सदस्यांनी त्यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या