आमदार विजय सरदेसाई यांचा मये मतदारसंघ दौरा, लोकांना विश्वासात घेऊन जाहिरनामा तयार करणार
डिचोली/प्रतिनिधी
मये मतदारसंघात भाजपच्या नावाने दगडही ठेवल्यास विधानसभा निवडणुकीत निवडून येणार हा भाजपचा समज म्हणजेच याचा अर्थ भाजपने मयेतील लोकांना विकत घेतले आहे, असा होतो. भाजपचा हाच भ्रम उतरविण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने मयेत आपले क र्य सुरू केले आहे. मयेत भाजपचा मागील जाहिरनामा काढल्यास त्यातील कोणती कामे झाली आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. नपेक्षा आमच्या पक्षातर्फे मयेवासीयांना अपेक्षित असलेला विकास आणि कामे त्यांना विश्वासात घेऊन जाहिरनामा तयार केला जाणार आहे. आणि त्याद्वारे मयेवासीयांच्या स्वप्नातील विकास साधला जाईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा आमदार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मये येथे केले.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मये मतदारसंघ दौऱयाला गावकरवाडा मये येथील श्री महामाया मंदिरातून प्रारंभ झाला. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, उपाध्यक्ष दुर्गादास कामत, मयेचे नेते संतोषकुमार सावंत, गट अध्यक्ष आनंद पार्सेकर, प्रवक्ते एड. विशाल मातोणकर, विरेंद्र पत्रे, उदय पत्रे, श्रीकृष्ण हळदणकर, श्रीजया हळदणकर व इतरांची उपस्थिती होती. देवी श्री महामायेला श्रीफळ ठेऊन या दौऱयाला प्रारंभ झाला.
मयेची आजपर्यंत भाजपकडून फसवणूकच
मयेत भाजपचा आमदार गेली अनेक वर्षे निवडून येत आहे. गेली दहा वर्षे भाजपचे सरकार आहे. मात्र मयेतील समस्या विषय आजही जैसे थेच आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयात त्यांनी आम्ही मयेच्या समस्या सोडवित असल्याचे म्हटले आहे. विकास बाजूलाच राहिला, अद्याप समस्याच सोडविण्यात अपयशी ठरलेल्या या भाजप सरकारकडून मयेवासीयांची केव. फसवणूकच झालेली आहे. मयेला सक्रिय आणि मतदारसंघाची तळमळ असलेला आमदार हवा. आमदार चांगला उद्योजक असला म्हणून आळशी नसावा. मये गेल्या पाच वर्षांत मागे राहण्यास हे एक कारण आहे. मये हा शेतीप्रधान गाव आहे. मात्र मयेतील शेतकऱयांकडे असलेले कृषीकार्ड हे केवळ आधारभूत किंमतच स्विकारण्यासाठी मर्यादित आहे. त्यापुढे त्यांना काहीच लाभ घेता येत नाही. शेतकऱयांचे असे प्रश्न सोडवू शकत नाहीत, आणि मुख्यमंत्री स्वयंपूर्ण गोयच्या घोषणा आणि स्वप्न? पाहत आहेत. हे हास्यास्पद आहे. चोडण पुलाविषयीही केवळ.फसवणूकच झाली आहे. अशी टिका आमदार विजत सरदेसाई यांनी केली.
मये मतदारसंघात भाजपप्रमाणे गोवा फॉरवर्ड पक्ष आयात उमेदराला उमेदवारी देत नसून संतोषकुमार सावंत हे स्थानिकच उमेदवार आहेत. ते मयेचे रहिवासी असून निवडून आल्यानंतर ते पूर्णवेळ मयेच्या जनतेसाठी देणार. जनतेची सेवा व काम करण्याची इच्छा व तळमळ असलेला बहुजन समाजातील उमेदवर या पक्षातर्फे देण्यात आला असून लोकांनी येणाऱया निवडणुकीत स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यावे. मयेत भाजपला झालेला विरोध म्हणजे भाजपची पातळी दाखवूत देत आहे. येणाऱया काळात संपूर्ण राज्यात भाजपला असेच दिवस पहावे लागणार असून एक क्रांती घडणार आहे. या क्रांतीत भाजप नेस्तनाबूत होणार, असे पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी सांगितले.
मयेचे आमदार मतदारसंघाच्या समस्या सोडविण्यात फोल
राज्याच्या चाळीसही मतदारसंघामध्ये फातोर्डा या मतदारसंघात आमदार विजय सरदेसाई यां?नी साधलेला विकास हा दैदिप्यमान आहे. तशाच प्रकारचा विकास मयेत साधण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी मयेत लोकांनी आजपर्यंत झालेल्या फसवणुकीचा.वचपा काढण्यासाठी पुढे यावे. आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी दाखविण्यापेक्षा कार्य करून लोकांचे जिवन सुसह्य करण्याचे आपले ध्येय आहे. मयेच्या स्थलांतरित मालमत्तेचा विषय भिजत पडला आहे. मागील निवडणुकीतील भाजपचा जाहिरनामा काढून त्यातील किती कामे आमदारांनी केली ते लोकांनी पहावे. नपेक्षा आम्ही लोकांना हवी असलेली आणि सरकारकडे शक्मय असलेलीच कामे करून देण्याची आश्वासने जाहिरनाम्यात देणार व ती करून घेणार. अशक्मय असलेल्या कामांची आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करणार नाही. असे उमेदवार संतोषकुमार सावंत यांनी सांगितले.
गावकरवाडा मये येथील महामाया देवीच्या मंदिरात, शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या मंदिरात, केळबाईवाडा मयेतील केळबाई देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन दौऱयाला प्रारंभ झाला. त्या त्या ठिकाणी लोकांचे विविध प्रश्न व समस्या आमदार विजय सरदेसाई, किरच कांदोळकर यांनी ऐकून घेतल्या. तसेच काही प्रमुख कार्यकर्त्यांच्रा घरांनाही भेटी देऊन कार्यकर्ते व लोकांशी संवाद साधला. या दौऱयात मोठय़ा संख्येने लोकांची उपस्थिती होती.