वृत्तसंस्था/ मँचेस्टर
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डे बरोबर मँचेस्टर युनायटेड क्लबने नुकताच नवा करार केला. 2009 नंतर त्याचे या संघात पुनरागमन झाले आहे.
मँचेस्टर युनायटेड आणि रोनाल्डो यांच्यात दोन वर्षांचा करार करण्यात आला आहे. यापूर्वी म्हणजे 2003 ते 2009 या कालावधीत रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळत होता. त्याने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडला आठ प्रमुख स्पर्धा जिंकून दिल्या होत्या. रोनाल्डो यापूर्वी युवेंटस क्लबकडून खेळत होता.