प्रतिनिधी /पणजी
गोवा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस खेमलो सावंत यांनी आपण सांखळी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची जाहीर केले.
खेमलो सावंत यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना आपण एक इच्छुक उमेदवार आहे. सांखळी मतदारसंघात काँग्रेसला विजयाची संधी आहे. आपल्यासह मजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, माजी आमदार प्रताप गावस, तसेच माजी नगराध्यक्ष सुनिता वेरेकर या देखील काँग्रेस उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आमच्या 4 पैकी एका कोणाला उमेदवारी मिळाली तरी आम्ही एकमेकांसाठी काम करू, असे ते म्हणाले. आपण अलिकडचे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना भेटलो व त्यांच्याशी चर्चाही केली. त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली, असेही ते पुढे म्हणाले.