वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
2022 सालातील फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्र फेरी स्पर्धेतील गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने हंगेरीचा 4-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत पूर्ण 3 गुण वसूल केले.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. उत्तरार्धातील खेळाच्या दहाव्या मिनिटाला रहिमने इंग्लंडचे खाते उघडले. दरम्यान, हॅरी केन आणि हॅरी मॅग्वेरी यांनी हेडरद्वारे प्रत्येकी एक गोल केला. इंग्लंडचा चौथा गोल डिक्लेन राईसने सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना नोंदविला. या संपूर्ण सामन्यात हंगेरीला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेत इंग्लंडचा संघ आपल्या गटात चार सामन्यातून 12 गुणांसह आघाडीवर आहे. या गटात पोलंड दुसऱया स्थानावर आहे. पोलंडने गुरुवारच्या सामन्यात अल्बेनियाचा 4-1 असा पराभव केला.
लंकेचा दक्षिण आफ्रिकेवर 14 धावांनी विजय
3 एसपीओ 14-मार्करम (96)-प्रयत्न अपुरे
वृत्तसंस्था
कोलंबो
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान लंकेने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 14 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात लंकेच्या आविष्का फर्नांडोला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 300 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 6 बाद 286 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 14 धावांनी गमवावा लागला.
लंकेच्या डावामध्ये आविष्का फर्नांडोने 2 षटकार आणि 10 चौकारांसह 118 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 तर मार्करम आणि शम्सी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 6 बाद 286 धावा जमविल्या. मार्करमने 96, व्हान डर डय़ुसेनने 59, मलानने 38, क्लासेनने 36 धावा केल्या. लंकेतर्फे अकिला धनंजयने 2 तर करुणारत्ने, हसरंगा, जयविक्रमा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
लंका- 50 षटकात 5 बाद 300, दक्षिण आफ्रिका- 50 षटकात 6 बाद 286 (मार्करम 96, व्हान डर डय़ुसेन 59, क्लासेन 36, मलान 38, अकिला धनंजय 2-65, करुणारत्ने, हसरंगा, जयविक्रमा प्रत्येकी 1 बळी).