तीनशेहून अधिक समर्थकांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रतिनिधी/पणजी
कुंभारजुवे मतदारसंघातील आमदार पांडुरंग मडकईकर यांचे निकटचे कार्यकर्ते समिल वळवईकर यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व अन्य पदाधिकाऱयांनी वळवईकर व त्यांच्या sतीनशेहून अधिक कार्यकत्यांना रितसर प्रवेश दिला.
समिल वळवईकरसारखे तरुण कार्यकर्ते ज्यांच्याकडे सामाजिक कार्याचा चांगला अनुभव आहे, त्यांचे पक्षात स्वागत आहे. येत्या निवडणुकीत कुंभारजुवे मतदारसंघासह अन्य मतदारसंघात विजयी होऊन काँग्रेस सत्तेवर येणार आहे, असे चोडणकर यावेळी म्हणाले.
येथील काँग्रेस कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात गिरीश चोडणकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजीमंत्री मिकी पाशेको, काँग्रेस कार्यकर्ते एल्वीस गोम्स, संकल्प आमोणकर, विजय भिके, जनार्दन भंडारी एम. के शेख, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वळवईकर यांनी मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करुन कुंभारजुवेतील आपल्या शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यांच्या सोबत प्रामुख्याने करमळीचे सरपंच उत्तम मुरगावकर, माजी सरपंच व विद्यमान पंच राजेश नाईक, समाज कार्यकर्ते अबंर आमोणकर, गोलती नावेलीचे माजी पंच जुलियो हेरेदिया, निकोलोस रापोझ, नावेलीचे मोहन प्रियोळकर, कुंभारजुवेच्या माजी सरपंच मनिषा मधु सावंत, दिवाडीचे लक्ष्मीकांत पै, ओल्ड गोव्याचे ऍड. शैलेश गावस, खोर्लीचे तातू गावस, खोर्लीचे आल्बीन सिक्वेरा व संदीप केरकर, गोमंतक बहुजन महासंघचे सचिव विजय केळुसकर, भारतीय वायु दलाचे माजी सैनिक मिनिन पिंटो, बांयगिणीच्या समाजकार्यकर्त्या दर्शना साखरदांडे, प्रकाश आचार्य, रघुवीर वळवईकर, खोर्लीचे सुदेश नानोडकर, उद्योजक विन्सन का पॉला यांच्यासह अन्या आजी माजी सरपंच पंच तसेच इतर मोठय़ा संखेने वळवईकर यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.